हेडलाईन्स :
दापोली : दापोलीत उदयास येणार शहर विकास आघाडी! नाराज इच्छुकांची मोट बांधून नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत वन टू का फोर करण्याची काहींची योजना. अनेक इच्छुकांनी भरले अपक्ष फॉर्म, कदम-दळवी वादाचा फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता. अपक्ष उमेदवारांनी वाढवले पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचे टेन्शन.
रत्नागिरी : एसटी कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनाचा आजचा 32वा दिवस; रत्नागिरी आगार अजून बंदच. 3133 कर्मचारी काम बंद आंदोलनात सामील. काल रात्री उशिरापर्यंत जवळपास तीनशे फेऱ्यातून तीन हजार पेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक.
रत्नागिरी : एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदलीचा सपाटा सुरू. अनेक कर्मचारी नाराज, तर या दडपशाहीमुळे संप कायम ठेवण्याचे कामगार व संघटनांचे संकेत
खेड : तालुक्यातील अस्तान ग्रामपंचायतीच्या 14 व्या वित्त आयोग व ग्रामनिधीतील 8 लाख 24 हजार 730 रुपयांच्या अपहार प्रकरणी ग्रामसेवक अद्याप फरार, तर सरपंचाची जामीनावर सुटका. शशिकांत शंकर जाधव (वीर, चिपळूण) या फरार झालेल्या ग्रामसेवकाचा शोध पोलीस घेत आहेत.
मंडणगड : मंडणगडच्या आगार प्रमुखांनी आपल्या पतीला संपातून बाहेर पडण्यासाठी सतत आग्रह मानसिक छळ केल्याची पत्नीची तक्रार दाखल. कामावर हजर व्हा अन्यथा कारवाई करू अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्याने मानसिक दबावाखाली आल्याने पतीची प्रकृती ढासळण्याची तक्रार मंडणगड आगारातील चालक राजेंद्र नागरे यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात केली आहे. तर सदर कर्मचाऱ्याच्या पत्नीने केलेली तक्रार ही खोटी व खोडसाळ असल्याचा खुलासा आगार व्यवस्थापक फडतरे यांनी केला आहे.
रत्नागिरी : जयगड येथील बेपत्ता झालेल्या नावेद 2 नौकेचे अवशेष शोधण्यासाठी स्कुबा ड्रायव्हरची घेतली मदत. समुद्राच्या तळाशी 11 मीटर खोलात एक मच्छिमारी नौका असल्याचे आले आढळून. खोल समुद्रात वाळूत असलेले हे अवशेष कोणत्या नौकेचे आहेत याचा शोध सुरू.
मंडणगड : मंडणगड आगारातील 24 कामगार निलंबित, तर त्यातील दोन जण कामावर हजर तर 22 जणांची सेवा समाप्ती.
खेड : लोटे औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कंपन्यांमधून होणाऱ्या प्रदूषणामुळे स्थानिक नागरिक हैराण. तीन गावांतील ग्रामस्थांचे स्थलांतर तर जवळपासच्या आंबा-काजूच्या कलमाना मोहोर किंवा फळे येत नसल्याने ग्रामस्थांची कंपन्यांविरोधात भूमिका
रत्नागिरी : अनेकांची कोरोनाच्या दुसरा डोसकडे पाठ, तर 22 हजार जणांनी केले दुर्लक्ष. एक लाखाहून अधिक जणांनी घेतला नाही पहिलाही डोस. कोरोना लसीच्या मात्रा पुरेशा उपलब्ध आहेत, सार्वजनिक ठिकाणीही लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या सुरक्षेसाठी दोन डोस घेणे आवश्यक आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठवले यांचे आवाहन
चिपळूण : आगामी पालिकेच्या निवडणुकीत शहर राष्ट्रवादी काँग्रेसची ‘एकला चलो रे’ ची भूमिका. काँग्रेसला आघाडीबाबत प्रस्ताव देऊनही अद्याप कोणतीही प्राथमिक चर्चा न झाल्याने स्वबळावर निवडणूक लढवावी अशी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून मागणी
रत्नागिरी : वैशाली कन्स्ट्रक्शनचे मालक रमेश साळवी या बांधकामव्यवसायिकाला ग्राहक निवारण आयोगाचा तीस हजाराचा दंड. शंकर पांडू नाईक (राहणार मुरुगवाडा, रत्नागिरी) यांनी ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे खरेदी खताबाबत केली होती तक्रार. खरेदी खताची पूर्तता न केल्यास नाईक यांच्याकडून स्वीकारलेली 11 लाख 50 हजार रुपये पंधरा टक्के व्याजाने देण्याचे रमेश साळवी यांना आदेश.
रत्नागिरी : परदेशातून रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत एकूण 512 जण जिल्ह्यात आले असून त्यापैकी फक्त 150 जणांशी संपर्क झाला आहे असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. तर 362 जणांचा अद्यापही शोध जारी.
दापोली : राष्ट्रवादी शिवसेना आघाडी विरोधी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष काम करणाऱ्या नेते व कार्यकर्त्यांवर कारवाईचा बडगा उघडणार. आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी व राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी पत्रकार परिषदेत केले जाहीर
खेड : प्रलंबित प्रश्नांसह जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी प्रत्येक तालुकास्तरावर 10 ते 12 डिसेंबर रोजी होत आहे प्राथमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन.
तर 27 डिसेंबरला होणार जिल्हास्तरीय धरणे आंदोलन
राजापूर : 0 ते 5 पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी होताना राजापुरातील तब्बल 50 शाळा बंद पडण्याची टांगती तलवार.
रत्नागिरी : जिल्ह्यात 697 शस्त्र परवाने रद्द. गेल्या तीन वर्षात एकही शेती शस्त्र पुरावा मंजूर करण्यात आलेला नाही. शासन निर्णयानुसार विविध कारणास्तव 697 शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी स्वसंरक्षणाचे परवाने ज्यांच्याकडे होते त्यातील ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांना परवाने रद्द का करू नये अशा नोटिसा बजावण्यात आल्याचे सांगण्यात येते.
खेड : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे टपाल व्यवस्था कोलमडली. न्यायालयीन प्रकरणातील टपाल, सरकारी टपाल तसेच नोकरी संदर्भातील टपाला वेळेवर मिळत नसल्याने मनस्ताप तर अनेकांची कामे खोळंबली.
चिपळूण : वाशिष्ठी नदी गाळ मुक्त करण्यासाठी चिपळूण बचाव समितीने सुरू केलेल्या साखळी उपोषणाला पहिले यश. शासनाकडून साडेसात कोटी मंजूर करण्याचे आमदार शेखर निकम यांनी दिलेले आश्वासन. तर पूर्ण रक्कम मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे बचाव समितीने केले स्पष्ट
रत्नागिरी : तालुक्यातील नेवरे येथे झाड तोडताना करीम पटेल या तरुणाचा झाड अंगावर पडल्याने मृत्यू झाला आहे. जखमी असताना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येते
गुहागर : ओबीसींचे राजकारणातील अस्तित्व व महत्त्व संपवण्याचा आघाडी सरकारचा घाट. हे कट कारस्थानच असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने उघड. भाजपचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली माहिती.
रत्नागिरी : तेली समाजाची अस्मिता संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून तेली समाज जोडो रथयात्रा 22 डिसेंबर रोजी रत्नागिरीत.