(मुंबई)
वाहन चालकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. चारचाकी सहप्रवाशांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी चारचाकी कारमधील सर्व प्रवाशांना १ नोव्हेंबरपासून सीटबेल्ट लावणं बंधनकारक करण्यात आल आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी परिपत्रक जारी करत दिली आहे. वाहनचालकांना आणि प्रवाशांना कारमध्ये सिटबेल्टची सुविधा सुरू करण्यासाठी 1 नोव्हेंबरपर्यंतचा अवधी दिला होता. कार चालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे आता सीट बेल्ट वापरण प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे.
तसेच दुचाकी चालवणारे चालक व सहप्रवासी यांनी हॅल्मेट परिधान न केल्यास मोटार वाहन कायदा कलम १२९ अन्वये दंडास पात्र आहे, असेही परिपत्रकात म्हटले आहे .
कारचालकाने तसेच प्रवाशांनी सिट बेल्टशिवाय प्रवास केल्यास मोटार वाहन कायदा 2019 च्या अंतर्गत 149 (b) नुसार त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.