(मुंबई)
भारतात रेल्वेचे जाळे सर्वत्र पसरले असल्याने रेल्वेकडून प्रवाशांना नवनव्या सुविधा दिल्या जातात. प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रेल्वेनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. रेल्वेतील खानपान सेवा सुधारण्यावर आता रेल्वे मंत्रालय भर देत आहे. रेल्वे प्रवासादरम्यान लोकांना खाण्यापिण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते यासाठी भारतीय रेल्वे आता ट्रेनमध्ये खाण्यापिण्याच्या सुविधांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी पावले उचलली आहे.
लांबच्या प्रवासात अनेकदा जेवणाची गैरसोय होते यामुळेच रेल्वे बोर्डाने ट्रेनमध्ये मिळणाऱ्या जेवणाच्या मेन्यूमध्ये बदल केला आहे. रेल्वे प्रवाशांना आता प्रवासात प्रादेशिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. लिट्टी-चोखा ते इडली-सांबारपर्यंत असे सर्व प्रादेशिक पदार्थ प्रवाशांना रेल्वेत मिळणार आहेत. तसेच जैन समाजाच्या लोकांसाठी शुद्धा शाकाहारी भोजनाची सुद्धा व्यवस्था करण्यात आहे.
मधुमेहाचा त्रास असलेल्या प्रवाशांना ट्रेनमध्ये उकडलेल्या भाज्या आणि ओट्स सुद्धा दिले जाणार आहेत. रेल्वे बोर्डाने ट्रेनमध्ये आठ डिशचा समावेश केला आहे. नव्या बदलानंतर ट्रेनमध्ये आत लहान बाळासाठीसुद्दा जेवण व्यवस्था करण्यात येणार आहे. राजधानी, दुरांतो, शताब्दी आणि वंदे भारत या सर्व प्रीमियम ट्रेनमध्ये २६ जानेवारीपासून हा बदल लागू करण्यात येणार आहे.
या प्रादेशिक लोकप्रिय पदार्थांचा आता आस्वाद घेता येणार
- लिट्टी चोखा, इडली सांभार, डोसा, वडापाव, पावभाजी, भेळपुरी, खिचडी, झालमुडी, व्हेज- नॉन व्हेज मोमोज, स्प्रिंग रोल आदी प्रादेशिक पदार्थ ट्रेनमध्ये मिळणार आहेत.
- जैन समाजातील लोकांसाठी खास कांदा-लसूणशिवाय जेवण दिले जाणार आहे, एखाद्याला मधुमेहाचा त्रास असेल तर उकाडलेल्या भाज्या, मिल्क ओट्स, मिल्क – कॉर्न फ्लेक्स, अंड्याचा पांढरा भाग घेऊन केलेले ऑम्लेट इत्यादी पदार्थही ट्रेनमध्ये मिळणार आहेत.
- दक्षिण भारतीय प्रवाशांना नाचणीचे लाडू, नाचणीची कचोरी, नाचणीची इडली, नाचणी डोसा, नाचणी पराठा, नाचणी उपमा मिळेल.