(नवी दिल्ली)
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनकडून आज शनिवारी जाहीर करण्यात आलेला देशव्यापी बँक संप मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे आज देशभरातील बँका सुरु राहणार आहेत. कर्मचा-यांच्या मागील ५ वर्षांपासून लावून धरलेल्या मागण्यांवर तोडगा काढण्यास इंडियन बँक असोसिएशन आणि आर्थिक सेवा विभागाकडून होकार देण्यात आला आहे. मुख्य कामगार आयुक्तांसोबत (केंद्र) बँक संघटनांच्या झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
आऊटसोर्सिंग आणि अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रान्सफर्स बँकिंग इंडस्ट्रीजच्या मान्यतेविना होणार नाही. सोबतच बँकांकडून कामगार कायद्यांची अंमलबजावणी सक्तीने करणार, कामगार कायद्यांचे पालन होत नसल्याचा बँकिंग संघटनांचा आरोप होता. काही बँकांच्या कर्मचा-यांसोबत असलेल्या वादावरदेखील लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय कामगार आयुक्तांनी पुढाकार दाखवला आहे. या चर्चेनंतर अखेर ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनकडून आजपासून पुकारण्यात आलेला संप मागे घेतला आहे.
The All India Bank Employees' Association (AIBEA) has withdrawn its November 19 strike call after an understanding was reached with the Indian Banks' Association (IBA) and the bank managements, said a top official. pic.twitter.com/qspRCIbJrP
— IANS (@ians_india) November 18, 2022
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने कॅथॉलिक सीरियन बँक आणि डीबीएस बँकेच्या कर्मचा-यांना ११ व्या द्विपक्षीय वेतन सुधारणा नाकारण्यासह कायमस्वरुपी नोक-यांचे आऊटसोर्सिंग (कॅश मूव्हमेंट जॉब आणि हाऊसकीपिंग जॉब) आणि काही बँकांमधील नोकरीच्या सुरक्षिततेला धोका यासह अनेक मुद्यांच्या निषेधार्थ आज १९ नोव्हेंबर रोजी देशव्यापी संपाची हाक दिली होती.
केंद्र सरकारने कइअ आणि बँक युनियनला 16 नोव्हेंबर रोजी चर्चा सुरु करुन संप टाळण्यासाठी तोडगा काढण्याचे निर्देश दिले होते. दिल्लीत सीएलसी रामिस थिरु यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सलोखा बैठकीत हे निर्देश देण्यात आले होते. परंतु कोणताही तोडगा न निघाल्याने आज बँकांचा देशव्यापी संप होणार असल्याचं संघटनेनं सांगितलं होतं. त्यानंतर उशिरा पुन्हा या मागण्यांबाबत चर्चा झाली आणि ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (अकइएअ) ने संप मागे घेण्याची घोषणा केली.