(ज्ञान भांडार)
सध्या कडक उन्हाळा सुरु असला तरी पावसाळा सुरू होण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. कोकणात पाऊस कायम मोठ्या प्रमाणावर पडत असतो. शक्यतो पाऊस सुरुवात होताना व परत जाताना अनेक वेळा आकाशात गडगडत असताना त्यातून वीज पडण्याचा धोका जास्त असतो. दरवर्षी आपल्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीज पडल्याचे आपण ऐकतो कींवा वाचतो.
आकाशातून पडणाऱ्या विजेचा सर्वात आधी आपल्याला प्रकाश दिसतो आणि त्यानंतर आपल्याला आवाज ऐकता येतो, याला सुद्धा एक कारण आहे. आवाजाची गती असते ती प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असते म्हणून सुरुवातीला आपल्याला प्रकाश दिसतो आणि त्यानंतर आवाज येतो येतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्याची वाफ होते आणि ही पाण्याची वाफ वरती आकाशात जात असते, अशी ही वाफ आकाशामध्ये जात असते, तसे त्याचे तापमान 1 अंश सेल्सिअसने कमी होत जाते. अशावेळी जशीजशी वाफ वर जाते तसे त्याचे रूपांतर बर्फाच्या तुकडामध्ये होत असते.
अनेकदा आकाशातून गारा पडत असतात आणि अशा वेळी ह्या गारा म्हणजेच बर्फाचे तुकडे होय. जेव्हा पावसाचे वातावरण तयार होते, तेव्हा हे ढग एकमेकांना घासतात आणि यांच्यातून जे करंट बाहेर पडतो त्याला स्टॅटिक करंट असे म्हणतात. या स्टॅटिक करंट चा पॉझिटिव्ह चार्ज असतो, तो आकाशाकडे वरती खेचला जातो आणि निगेटिव्ह चार्ज वस्तू जमिनीकडे खेचला जातो. हा नेगेटिव्ह चार्ज आहे जो पॉझिटिव चार्ज ला शोधत असतो म्हणजे जेथे पॉझिटिव चार्ज ला शोधत निगेटिव्ह चार्ज खाली येत असतो याचाच अर्थ वीज पडत असते.
अशा वेळी बहुतेक ठिकाणी प्रचंड वेगाने वारा वाहत असतो. ढगांचा गडगडाट होतो आणि अशावेळी ढगांचे घर्षण होऊन वीज जमिनीवर पडू लागते. अशावेळी निगेटिव्ह चार्ज जमिनीवर पडल्याने पॉझिटिव्ह चार्ज वर जातात आणि पॉझिटिव्ह चार्ज शोधत जमिनीवर येतात आणि त्याचे रूपांतर विजेमध्ये होते. जेव्हा वीज आकाशातून जमिनीकडे पडते त्या विजेचा वेग दहा कोटी वोल्ट एवढा असतो आणि घरातील जी वीज असते तिचा तो लाईट 200 वोल्ट एवढा असतो.
या वोल्ट मध्ये जो वेग असतो तो 10000 एवढा असतो आणि आपल्या घरातील जे फ्रीज चालत असते 5 अंपिअर वर चालत असते. सूर्याचे तापमान सहा हजार अंश सेल्सिअस एवढे असते यावरून तुम्हाला अंदाज येईल की विजेचे तापमान व त्याच्यातील क्षमता किती भ”यंकर असते आणि वीज पडण्याचा जो टाइमिंग असतो तो अत्यंत 0.00005 सेकंड एवढा कमी असतो.
जेव्हा वीज आकाशातून जमिनीकडे पडत असतो तेव्हा तिचे जी टेंपरेचर असते 27000 सेल्सिअसपेक्षा जास्त असते. जेव्हा वातावरणामध्ये बदल होत असते तेव्हा थंडपणा निर्माण होत असतो आणि अशा वेळी जेव्हा वीज जमिनीवर पडते तेव्हा त्याचा आवाज होतो.आपल्या सर्वांना माहिती असेल की जेव्हा गरम वस्तूवर थंड पाण्याचे थेंब पडतात तेव्हा त्याचा आवाज होतो.
आपण स्वयंपाक घरामध्ये पाहिले असेल, जेव्हा आपण कढईच्या तेलामध्ये पाण्याने धुतलेली भाजी टाकतो तेव्हा आवाज निर्माण होतो व त्याचे तापमान कमी असते म्हणून हा आवाज मर्यादित असतो परंतु जेव्हा वीज मोठ्या वेगाने येत असतें अशा वेळी जेव्हा विजेवर थंड पाण्याचे थेंब पडतात तेव्हा त्यातून येणारा आवाज हा खूपच मोठा आणि भयंकर असतो.
जेव्हा वीज आकाशातून जमिनीवर पोहोचत असते तेव्हा त्यातून लहरी निर्माण होत असल्याने अशा वेळी अनेकदा आपल्याला सल्ले सुद्धा दिले जातात की पाऊस पडत असताना मोबाईल वर बोलू नये. कारण की मोबाईलचे लहरी शोधत वीज आपल्या जवळ येत असते आणि त्याच बरोबर झाडावर सुद्धा अनेकदा वीज पडते कारण की जमिनीपर्यंत पोहचताना मध्ये झाड असेल त्यातून वीज जमिनीवर येत असते आणि अशावेळी झाड सुद्धा पडत असते. अशावेळी वीज जमिनीवर पडण्याऐवजी झाडाच्या मार्फत वीज जमीनीपर्यंत पोहोचत असते म्हणून पावसामध्ये झाडाखाली थांबणे सुद्धा धोक्याचे ठरू शकते.
अनेकवेळा मोकळ्या मैदानावर वीज पडते, परंतु जर तुम्ही मोकळ्या मैदानावर चालत असाल तर अशा वेळी पॉझिटिव्ह जो चार्ज असतो आपण चालत असताना जमिनीवर घर्षण निर्माण होतात, गवताची हालचाल होते आणि अशा वेळी वीज पडण्याची शक्यता जास्त असते. म्हणून जर तुम्ही मोकळ्या मैदानावर असाल तर अशा वेळी कुठेही धावपळ न करता एका ठिकाणी फक्त बसून राहा.
तुम्ही घरात बसलेला असताना आणि पाऊस पडत असेल तर अशा वेळी खिडक्यांच्या रॉडला घट्ट पकडून बसू नका कारण की अशा वेळी लोखंडाला विजेचा धक्का बसू शकतो. त्याचबरोबर विजेच्या टॉवर खाली सुद्धा उभे राहू नका अन्यथा वीज पडताना धोका निर्माण होतो. सध्या करंटच्या माध्यमातून विजेच्या टॉवरवर विपरीत परिणाम होऊ शकतो
टीप : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य प्रचलित ज्ञानावर आधारित आहे.