(रत्नागिरी)
आंब्याच्या बागेतील शेतघरात बेशुद्धावस्थेत पडलेल्या प्रौढाला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. आनंद विनोद बोळे असे त्या मृत झालेल्या प्रौढाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २२) पावणेबाराच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे आंब्याचे बागेमध्ये आनंद बोळे यांना पाहण्यासाठी गेले होते. शेतघराचा दरवाजा बोळे यांनी उघडला नाही म्हणून तक्रारदारानी तालुक्यातील वाडाजून येथील त्यांच्या सुभाष भुवड, अतुल कुर्टे, अरूण धुमक यांना बोलावले. त्यांनी दरवाजा ढकलून उघडला. तेव्हा बोळे बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांना तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे