( रत्नागिरी )
बेपत्ता झालेल्या वृध्दाचा मृतदेह आंबेशेत येथील खाजणात आढळून आला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल लतीफ हसन मिरकर ( ८५ , रा . कर्ला , रत्नागिरी ) असे मृतदेह सापडून आलेल्या वृध्दाचे नाव आहे. अब्दुल मिरकर हे १७ नोव्हेंबर २०२२ ला घरात कोणालाही न सांगता निघून गेलेले होते . आज गुरुवारी सकाळी त्यांचा मृतदेह आंबेशेत येथील खाजणात तेथील ग्रामस्थांना दिसून आला. याबाबात त्यांनी शहर पोलिसांनी माहिती देताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवण्यात आला.