( देवरुख / प्रतिनिधी )
कर्नाटक ते जयगड असा साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या ट्रकला ६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आंबा घाटातील चक्री वळणावर अपघात झाला होता. या अपघातात ट्रकसह साखरेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या अपघातप्रकरणी ट्रक चालक राणाभाई ईराभाई चावडा (६०. पोरबंदर, छायाप्लॉट, गुजरात) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन बेदरकारपणे वाहन चालवून विरुध्द दिशेला जावून १०० फुट खोल दरीत कोसळला. तसेच स्वत:च्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालक राणाभाई चावडा याच्यावर भादविकलम २७९, ३३७, मोटर वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.