(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील आंबव कोंड भुजबळराव येथे 3 हजार 900 रुपयांची घरफोडी झाल्याची घटना 7 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2022 दरम्यान घडली. याबाबतची फिर्याद सदानंद माने (आंबव कोंड भुजबळराव, शेवरेवाडी, संगमेश्वर) यांनी देवरुख पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदानंद माने हे 7 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान मुंबई येथे गेले हेते. 30 नोव्हेंबर रोजी ते आंबव येथील आपल्या घरी आले असता त्यांच्या बंद घराचे दर्शनी खिडकीचे रेजे तोडून चोरटयाने घरात पवेश केला. घरातील लाकडी पेटाऱ्याची कुलुपे तोडून 1200 रुपये किंमतीच्या दोन पितळेच्या कळश्या, 1200 रुपये किंमतीच्या दोन तांब्याच्या कळश्या, 1500 रुपये किंमतीचे एक तांब्याचे तपेले असा एकूण 3900 रुपयांचा मुद्देमाल अज्ञाताने लंपास केला. याबाबतची फिर्याद माने यांनी देवरुख पोलिसात दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञातावर भादविकलम 454, 457, 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास देवरुख पोलीस करत आहेत.