जाकादेवी वार्ताहर : गुरू एज्युकेशन इंडिया आयोजित नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय वेदिक गणित स्पर्धेत संजीवनी कोचिंग सेंटरचे २५ विद्यार्थी सहभागी झाले होते. परीक्षेत १००% स्पर्धेक उत्तीर्ण झाले असून, कु.संस्कार पानगले याने आंतरराष्ट्रीय रँक २ मिळवला. इंद्रनील पाटील व श्रुतिका माने या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय रँक ३ मिळवला. तसेच आश्लेषा कळंबटे, विराज देसाई, आशिष कळंबटे, दर्शन कुंभार, मनोज पाटील, मयुरेश कोवळे, तन्मय घाणेकर, आर्यन सनगरे, प्राची गोडसे, अवधूत देसाई, सुशांत नाईक, चिराग देसाई, ओजल कदम, सुयोग कोवळे, जिज्ञासा मोरे, संस्कार सुर्वे, आर्य पवार, सोहम पवार, निधी सुर्वे, चैतन्य धामणे या विद्यार्थ्यांनी A,B,C गटात आंतरराष्ट्रीय टॉप १० रँक मिळवली. आराध्य उरूनकर व खुदफीया रिफाई यांनीही या स्पर्धेत प्रशंसनीय कामगिरी केली.
सदरच्या विद्यार्थ्यांना संजीवनी कोचिंग सेंटरचे डायरेक्टर व सीईओ श्री. केदार कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले. फक्त दीड महिन्यात तयारी करून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे. श्री. केदार कुंभार आणि पालक वर्ग यांनी मुलांचे भरभरून कौतुक केले. तसेच भावी पिढीला वेदिक गणित शिकून भविष्यातील स्पर्धेत अनेक पाऊले पुढे राहण्याचे आवाहन श्री. कुंभार यांनी केले. स्पर्धेचे आयोजक गुरू एज्युकेशन इंडियाचे चे सर्वेसर्वा श्री. महेंद्र गिरी, शुभांगी गिरी, नेहा घाडगे, श्वेता उरणे, सागर भिसे व संपूर्ण गुरू परिवार, श्री. बाबुराव शिनगारे, ओमकार शिनगारे यांचे विशेष आभार मानले. तसेच जाकादेवी व रत्नागिरी येथील संजीवनी कुटुंबात सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी उज्ज्वल भविष्य घडवण्याची आशा व्यक्त केली.संजीवनी कोचिंग सेंटर परिवारात नर्सरी- दहावी, MPSC,UPSC, NEET, वेदिक गणित, सर्व स्कॉलरशिप परीक्षा, DMIT इ. ची तयारी अतिशय चांगल्या प्रकारे करून घेतली जाते. विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे.