(देवरूख)
सध्या नवरात्रोत्सवाची सगळीकडे धूम असून रात्री दांडीया रास रंगत आहे. तरूणाई गरब्याचा आनंद लुटतानाचे चित्र दिसत आहे. तालुक्यातील आंगवली गावचे ग्रामदैवत श्री सोमेश्वर मंदिर येथे गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत गरब्याचे आयोजन केले आहे. संंगमेश्वर तालुक्यातील आंगवली गावचे ग्रामदैवत श्री सोमेश्वर मंदिर येथे गावातील ग्रामस्थ एकत्रित येवून गरब्याचा आनंद लुटत आहेत. विशेष म्हणजे महिलांसह अबालवृध्द अतिशय शिस्तबद्ध फेर धरून दांडीया रास खेळताना दिसत आहेत.
मंदिराच्या समोरील बाजूच्या भव्य पटांगणावर महिला तसेच अबालवृध्द फेर धरत गाण्यांच्या ठेक्यावर गरब्याचा आनंद लुटत आहेत. गरब्याच्या विविध गाण्यांवर ठेका धरत सर्वजण तल्लीन होऊन जात आहेत. अतिशय शिस्तबद्धरित्या हे सर्वजण गरब्याचा आनंद लुटत आहेत. त्यामुळे एक वेगळेच वातावरण निर्माण झाले आहे. गेले दोन दिवस मंदिर परिसरात गरबा खेळला जात असून गरब्याचा आनंद लुटताना महिला, अबालवृध्द एकरूप होऊन जात आहेत.