(फुनगुस/येजाज पटेल)
मौजे असुर्डे (ता. संगमेश्वर) गावातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
गेली अनेक वर्षे रखडलेले काम पूर्णत्वास नेण्यासाठी श्री महालक्ष्मी ग्रामविकास मंडळ मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री वसंत विश्राम मनवे व सहकारी तसेच स्थानिक ग्रास्थांनी सतत पाठपुरावा करीत माजी आमदार श्री सदानंद चव्हाण व जिल्हा परिषद सदस्या सौ. रचनाताई महाडीक यांच्याकडे सतत मागणी लावून धरली होती. त्यामुळे कायम स्वरुपी रस्त्याचा विषय मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत अतिशय भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात आला. त्यामुळे रस्त्याला असलेले मोठे चढ कमी करून मजबुतीकरण, खडीकरण, डांबरीकरण अशा पद्धतीचे काम करण्यात आले.
लॉकडाउन मुळे कामाला विलंब जरी झाला असला तरी या वर्षी पावसाळ्या पूर्वी काम होतेय या बद्दल ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.