(संगमेश्वर / प्रतिनिधी )
संगमेश्वर तालुक्यातील कसबा गावचे सुपुत्र अशोक साळवी यांना ग्रामोद्योग भरारी पुरस्कार जाहीर झाला होता त्याचा वितरण सोहळा २९ ऑगस्ट रोजी राजभवन मुंबई येथे महामहीम राज्यपाल यांच्या शुभहस्ते पार पडला.
महाराष्ट्र राज्य खादी ग्रामउद्योजक मंडळ व शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून पारंपlरिक कारागीर नव तरुण, महिलांउद्योजकाना नवीन संधी उपलब्ध करुन दिली जाते.मंडळाच्या वतीने यशस्वी उदयोजकांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे म्हणुन मंडळ व मेघाश्रय संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी ग्रामोउद्योजक भरारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
या वर्षी हा मान संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागातील कसबा गावचे सुपुत्र युवा उद्योजक अशोक साळवी यांना मिळाल्याचे मंडळाचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी बिपीन जगताप यांनी जाहीर केले होते.पुरस्कार वितरण सोहळा राजभवन मंत्रालय मुंबई येथे राज्यपाल महोदय यांच्या शुभ हस्ते पार पडला. अशोक साळवी यांना ग्रामोउद्योजक भरारी पुरस्कार जाहीर मिळाल्याचे कळताच चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी भ्रमण ध्वनी वरुन संपर्क करुन अशोक साळवी यांचे अभिनंदन केले आहे.
अशोक साळवी यांना या पूर्वी खादी ग्रामउदयोग पुरस्कार, जिल्हा उदयोग केंद्र पुरस्कार, समाज भूषण पुरस्कार मिळाले असुन आता ग्रामोउद्योजक भरारी या मानाच्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.नुकताच साळवी यांना ग्रामोउद्योग भरारी पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या कार्यक्रमाला उद्योग मंत्री उदय सामंत, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डाॅ हर्षदीप कांबळे, मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, फाउंडेशनच्या अध्यक्षा सीमा सिंह उपस्थित होते.