(रत्नागिरी / प्रतिनिधी)
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहेत. कुठं थंडी तर कुठं आवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी रात्री (ता.8 जानेवारी) कोकणात मुसळधार पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे आंबा, काजू पीक धोक्यात आली आहेत. अवकाळी पावसामुळे काजू आणि आंबा या पिकाला आलेला मोहोर गळून पडण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. काजू, आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अनेक भागात मध्यरात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काही भागांमध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे तर काही भागांमध्ये पाऊस जोरदार पडत आहे. पुढील 24 तास कोकणासह राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर आज (9 जानेवारी) विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यात आहे. अवकाळी पावसाचा फटका आंबा, काजू पिकाला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
थंडीच्या वातावरण असताना अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. रत्नागिरीतील काही तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. तर संगमेश्वर, चिपळूण आणि खेड या भागांत रिमझिम पाऊस सुरू आहे. तर महाबळेश्वरमध्ये देखील तुरळक पाऊस पाहायला मिळाला. पावसामुळे काही गांवातील विज पुरवठा खंडीत झाला आहे. त्याचप्रमाणे याचा सर्वात जास्त फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. वातावरणातील बदलामुळे काजू आणि आंबा या पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे.
वातावरणाचा आंबा पिकाला धोका
कालपासून रत्नागिरीत जोरदार पाऊस सुरुवात झाला आहे. आणि ढगाळ वातावरण आहे. या जानेवारी महिन्यात ढगाळ वातावरण असणे हे आंबा पिकाला धोकादायक आहे. असेच जर वातावरण राहिले तर आंबा मोहोर गळून पडेल व शेतकऱ्याला नुकसानाला सामोरे जावे लागेल.
– आंबा व्यापारी तुकाराम घवाळी