( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंध ठेवून फसवणूक करणाऱ्या विवाहित तरुणावर जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला शनिवार 7 जानेवारी रोजी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. प्रणेश बाळकृष्ण गाडे (34, निवेंडी वरचीवाडी, रत्नागिरी) असे संशयित तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील आगरनरळ येथील एका 17 वर्षीय मुलीशी प्रनेश याची 2 वर्षापूर्वी ओळख निर्माण झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. यातूनच दोघांच्या शरीरसंबंध निर्माण झाले. याप्रकरणी पीडित मुलीने आपल्या जयगड पोलिस ठाण्यात प्रनेश याच्याविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी त्याच्यावर भादविकलम 376 व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 नुसार गुन्हा दाखल केला. त्याला अटक केल्यानंतर शनिवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने प्रनेश याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.