(रत्नागिरी)
तालुक्यातील आगरनरळ येथील अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेणाऱ्या विवाहित तरुणाला जयगड पोलिसांनी अटक केली. शनिवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे
या प्रकरणात प्रणेश बाळकृष्ण गाडे (३४, रा. वरची निवेंडी, रत्नागिरी) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. २ वर्षांपूर्वी प्रणेशने त्या अल्पवयीन मुलीशी ओळख निर्माण करून वारंवार शारीरिक संबंध ठेवले. याबाबत पीडितेने जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी प्रणेश विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तत्काळ अटक केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले यावेळी दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली आहे