(राजापूर / प्रतिनिधी)
राजापूर शहरालगतच्या बंगलवाडी गुरववाडी येथील पांजली कृष्णा गुरव (19) या तरूणीने अर्जुना नदीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. दरम्यान तीने विषारी द्रव्य पाशन करून नंतर नदीपात्रात उडी घेतल्याची माहिती पुढे आली आहे. तिच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकलेले नाही.
राजापूर शहरातील अर्जुना नदीपात्रातील वरचीपेठ येथील मोठ्या पुलाखालून पाण्यात एक तरूणी वाहून जात असल्याचे रस्त्याने जाणाऱया पादचाऱयांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ याची माहिती वरचीपेठ येथील नागरीकांना दिली. त्यानंतर वरचीपेठ येथील तरूण विनोद बाकाळकर, रवी बाकाळकर, दत्तपसाद पटेल, दिनेश जावकर यांनी नदीकडे धाव घेत सदर तरूणीला वाचविण्याचा पयत्न केला. मात्र पाण्याचा पवाह व खोली जास्त असल्याने त्यांना यश आले नाही. दरम्यानच्या काळात काहींनी खडपेवाडी येथील पज्योत खडपे, अनु खटावकर यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. या दोघांनीही नदीपात्रात पोहत जाऊन तरूणीला बाहेर काढले. त्यानंतर राकेश बेनकर यांच्या रिक्षातून तीला राजापूर ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र उपचारापूर्वीच सदर तरूणी मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱयांनी सांगितले. पांजली कृष्णा गुरव असे या तरूणीचे नाव असून तीने नदीत उडी घेण्यापूर्वी विषारी औषध पाशन केल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव, शहर अध्यक्ष विवेक गुरव, अरविंद लांजेकर यांच्यासह बंगलवाडी येथील ग्रामस्थांनी रूग्णालयात धाव घेतली. या पकरणाची खबर राजापूर पोलिसांना देण्यात आली असून सायंकाळी उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू होते. दरम्यान पांजली हिने आत्महत्या करण्यामागचे कारण समजू शकलेले नसून अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत