(मुंबई)
अमेरिका, चीन ईतर काही देशांपेक्षा भारतात महागाई कमी आहे, असा दावा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केला आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. डॉ. कराड यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय महानुभाव संमेलनाचा समारोप झाला. या कार्यक्रमापूर्वी त्यांनी भाजप कार्यालयात प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
कराड म्हणाले, जागतिक मंदीचे चिन्हे नाहीत. सध्या जे रिसेशन आले आहे, ते कोरोनामुळे आले असून, आता ते दूर होत आहे. जीसटी वाढतोय याचाच अर्थ महागाई कमी आहे. अर्थव्यवस्था सुस्थितीत आहे. कराड पुढे म्हणाले की, निर्मला सीतारामन यांनी दोनच दिवसांपूर्वी याबाबत राज्यसभा लोकसभेत निवेदन केले आहे. तसेच सुट्या पोह्यांवर जीएसटी नसून तो ब्रँडवर आहे. तसेच पॅकेज करून विकले तर जीएसटी लागणारच, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.