(श्रीनगर)
बॉलिवूड अभिनेता इम्रान हाशमी याच्यावर जम्मू-काश्मीरमध्ये आगामी चित्रपट ‘ग्राउंड जीरो’ च्या चित्रीकरणादरम्यान दगडफेक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी शूटिंग संपल्यानंतर इम्रान चित्रपटाच्या इतर टीमसोबत पहलगामच्या मार्केटमध्ये गेले होते.
त्यावेळी काही अनोळखी लोकांनी अभिनेत्यासह त्याच्यासोबत इतरांवर हल्ला केला. या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडफेक करणाऱ्यांविरोधात कलम 147, 148, 370, 336, 323 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अनंतनाग पोलिसांनी एका व्यक्तीची ओळख पटवली असून त्याला अटक केली आहे.