(रत्नागिरी )
🟧 मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा गुरववाडी येथील वळणावर 18 मार्च रोजी पाली ते हातखंबा असा बेदरकारपणे ट्रक चालून रस्त्याच्या लगतच चरात जाऊन अपघात झाला होता. या अपघातात ट्रक चालकाला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारानंतर ट्रक चालक अपघाताची खबर न देताच निघून गेल्याने स्वतःच्या व ट्रक मधील मालाच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबतची फिर्याद संजय कोळी (42 विजापूर) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात दिली.
🟧 नागनाथ महादेव आवताडे (42, सोलापूर) असे त्या ट्रक चालकाचे नाव आहे. संजय कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आवताडे याच्यावर भादवीकलम 279, 337, मोटर वाहन कायदा कलम 184, 134/177 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार वाजे करत आहेत.