(नागपूर)
रेव्येनू कायद्यान्वये जी व्यक्ती सतत १२ वर्षे एखाद्या जागेवर स्थाईक राहत असेल तर तो त्या जमीनीचा कायदेशीर मालक बनतो. परंतू या कायद्याचा विसर स्वतः माननीय कोर्टालाच पडला असल्याची घणाघाती टिका वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. नागपूर येथे विधानभवनावर काढण्यात आलेल्या ‘इशारा मोर्चा’ मध्ये ते बोलत होते.
महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने परिवार हे मागील ४०-५० वर्षांपासून गायरान जमिनीवर अतिक्रमण करून वास्तव्य करत आहेत. परंतू कोर्टाच्या एका निर्ययामुळे त्यांच्यावर आता बेघर होण्याची वेळ आली आहे व या सर्वांमध्ये महाराष्ट्र शासन हे निव्वळ बघ्याची भुमिका घेत असून स्वतःला सामान्य कुटूंबातील सांगणाऱ्या मुख्यमत्र्यांनी जर लवकरात लवकर भुमिका घेऊन गायरान जमीनीचा प्रश्न सोडवला नाही तर, रस्ता व आमचं नातं खुप जूनं आहे तेव्हा आम्ही मुख्यामत्र्यांचा रस्ता थांबवू असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
चंद्रकांत पाटील यांनी महापूरूषांबद्दल जे काही विधान केले त्यामधे काहीही नाविन्य नसून ती संघाची खुप अगोदरची मानसिकता आहे, चंद्रकांत पाटील यांनी यामध्ये संघाच्या संस्थांचे नाव न घेत त्या खोके संस्कृतीतून निर्माण झाल्याची कबूलीच दिली, त्याकरिता चंद्रकांत पाटील यांचा जाहीर सत्कार करायला पाहिजे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
वंचित बहुजन आघाडी तर्फे इशारा मोर्चा चे आयोजन २७ डिसेंबर रोजी करण्यात आले होते. यावेळी प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकुर, अशोक सोनोने, अरूंधती शिरसाठ, सविता मुंडे, डॉ निशा शेंडे, विलास वटकर, संगिता गोधनकर, शमिभा पाटील, अमित भुईगळ, डॉ रमेशकुमार गजबे, कुशल मेश्राम, राजू लोखंडे, विश्रांती रामटेके, रवी शेंडे, मुरली मेश्राम, अरविंद सांदेकर, इत्यादि पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.