(रत्नागिरी)
अनुलोम प्रेरित जनसेवा सामाजिक मंडळ आयोजित व रत्नागिरी कृषी विभाग यांच्या सहकार्याने गोळप येथील मंडळाने दत्तक घेतलेल्या राडये-घाणेकर वाडी येथे दहा प्रकारच्या भाजी पाला बियाण्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी माधव बापट यांनी कृषी विभागच्या विविध योजना, त्याची उपयुक्तता याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले की, भविष्यातही कृषी विभागातील असणाऱ्या योजनांचा लाभ देण्यासाठी कटिबद्ध राहू, फक्त लाभार्थीनी जागृत राहून लाभ घेणे गरजेचे आहे.
याप्रसंगी ऍड.अविनाश काळे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, पाण्याअभावी हिवाळयात भाजी करणे कठीण जाते परंतु पावसात पाणी असल्याने वाडीतील सर्व कुटूंबात भाजी केली तर पुढील किमान 3 ते 4 महिन्याचा भाजी खर्च मध्ये बचत होऊन ताजी भाजी मिळावी यासाठी सामूहिक बियाणे वाटप उपक्रम राबिवण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र भोवड यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, किमान पावसाळ्यात सर्वांनी भाजी केली तर गावात काही महिने भाजीबाबत स्वयंपूर्णता येऊ शकते, ताजी आणि पौष्टिक भाजी मिळू शकते. तसेच तरुणांनी या माध्यमातून शेतीकडे वळावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी कृषी तालुका अधिकारी माधव बापट, कृषी सहायक श्री. पोळ, अनुलोम भाग जनसेवक रवींद्र भोवड, जनसेवा सामाजिक मंडळाचे प्रमुख आणि ग्रामपंचायत सदस्य ऍड.अविनाश काळे, सचिव समित घुडे, सह सचिव प्रकाश संते,महेश पालकर, उदय राडये, अनंत राडये, यशवंत राडये, तुकाराम बेंद्रे, अर्पिता घाणेकर, हर्षाली राडये, सायली घाणेकर आणि वाडीतील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी वाडीतील 35 कुटूंबाना भाजी पाला बियाणे वाटप करण्यात आले.