(चिपळूण)
चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून मंजूर केलेल्या कामांपैकी अडरे येथील नालंदा बुद्ध विहाराच्या संरक्षक भिंतीच्या कामाचे भूमिपूजन दिनांक १६ सप्टेंबर रोजी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.
सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात आमदार शेखर निकम यांनी मंजूर करून आणलेल्या पाच कोटी रुपयांच्या कामांमध्ये अडरे येथील नालंदा बुद्ध विहाराच्या कामाचा समावेश आहे. त्याचा भूमिपूजन समारंभ तसेच अडरे गावातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा आमदार शेखर निकम व त्यांच्या समवेत इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या संरक्षण भिंतीच्या कामाच्या भूमिपूजन प्रसंगी आमदार शेखर निकम यांच्या समवेत सूर्यकांत खेतले , नारायण जाधव, सरपंच दीक्षा कांबळी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी आमदार शेखर निकम यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस जयद्रथ खताते, चिपळूण तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष नितीन ठसाळे, माजी सभापती सूर्यकांत खेतले, मयूर खे, रमेश राणे, डॉक्टर राकेश चाळके, निलेश कदम, नारायण जाधव, अडरे गावच्या सरपंच सौ दीक्षा कांबळे, उपसरपंच रीचा कदम, संजना कदम, माजी सरपंच रवींद्र कदम , अडरे बौद्ध मंडळाचे तथा शाखेचे अध्यक्ष प्रदीप कांबळे, माजी अध्यक्ष कृष्णा पवार, पत्रकार संदेश पवार, मिलिंद कांबळे, नितीन कांबळे, विजय कांबळे, देवेश जाबरे, विनोद कांबळे , देवराम कांबळे, प्रकाश कांबळे आदी उपस्थित होते.
यावेळी अडरे बौद्ध मंडळाच्या तथा चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती शाखा अडरे यांच्या वतीने आमदार शेखर निकम यांचा मंडळाचे अध्यक्ष प्रदीप कांबळे व माजी अध्यक्ष कृष्णा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच इतर अनेक मान्यवरांचे येथे स्वागत करण्यात आले . यावेळी आमदार शेखर निकम यांनी आपल्या मनोगतात बोलताना सांगितले की, अडरे गावातील विविध विकास कामे करण्यासाठी माझ्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत जास्तीत जास्त विकास निधी आणण्याचा माझा प्रयत्न असेल. नालंदा बुद्ध विहाराच्या कामासाठी दिला गेलेला निधी कमी पडू दिला जाणार नाही. तसेच वाडीतील अधिकाधिक विकास कामे होण्यासाठी निधी मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील, आपण सर्वांनी विकासासाठी सोबत काम करायला हवे असे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन, आभार संदेश पवार यांनी मांडले. कार्यक्रमाला अडरे बौद्धवाडीतील सर्व ग्रामस्थ, तक्षशिला महिला मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या तसेच अडरे पंचक्रोशीतील अनेक मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.