(मुंबई)
अग्निपथ योजनेतर्गत २०२३-२४ या सालाकरीता अग्रिवीर सैन्य भरती प्रक्रिया सुरू केली आहे. याकरीता प्रथम प्रवेश परीक्षा (लेखी परीक्षा) होणार आहे. या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्यांचीच शारीरिक चाचणी होणार आहे. ही भरती प्रक्रिया दोन टप्प्यात होणार आहे.
कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या महाराष्ट्रातील जिल्ह्यासह, गोवा राज्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्ह्यातील अविवाहित उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. याकरीता होणाऱ्या लेखी प्रवेश परिक्षेसाठी दि. १० फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. या परीक्षेसाठी पाच परीक्षा केंद्रे असून विद्यार्थ्यांना त्याच्या सोईचे परीक्षा केंद्र घेता येणार आहे.
लेखी परीक्षा १२ एप्रिलपासून सुरू होणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची दुसऱ्या टप्प्यात शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय तपासणी होणार आहे.