(रत्नागिरी)
अमली पदार्थांची विक्री प्रकरणातील तरुणी आणि तिच्या सहकाऱ्याला न्यायालयाने मंगळवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. मतीन डोंगरकर (३५,मुळ रा. कोकणनगर सध्या रा. माळनाका, रत्नागिरी) आणि प्रेरणा साठे (१९, रा. मूळ रा. कारवांची वाडी सध्या रा. माळनाका, रत्नागिरी) अशी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
मंगळवारी त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात दाखल करण्यात आले होते. यापूवी त्यांचे दोन साथिदार प्रविण प्रकाश परब (३७, रा. गवळीवाडी, रत्नागिरी) आणि ओंकार जगदीश बोरकर (२६, रा. चिंचखरी, रत्नागिरी) या दोघांनाही ५५ हजार रुपयांच्या अंमली पदार्थासह अटक करण्यात आली होती. त्यांना यापूर्वीच पोलिस कोठडीतून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्याने या गुन्ह्यातील संशयित चारही जण आता न्यायालयीन कोठडीत आहेत.