सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेचे संचालक, पिलवली येथील प्रतिष्ठित नागरिक प्रतापराव सावंत यांचे शनिवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. चिपळूण तालुका रेशन दुकानदार संघटनेचे ते गेली अनेक वर्षे क्रियाशील सदस्य होते. सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कार्यात ते कायम अग्रेसर असत.
प्रतापराव सावंत यांच्या अकाली निधनामुळे सह्याद्री शिक्षण संस्थेची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे अशी प्रतिक्रिया आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केली.