(चिपळूण )
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवन च्या ग्रामीण कृषी कार्यानुभव 2024- 25 च्या `कृषी उमेद’ कृषीकन्यांद्वारे आबिटगाव येथे रानभाज्या व भरडधान्य पाककला स्पर्धा आयोजित केली होती.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाच्या संचालिका सौ. अंजलीताई चोरगे मॅडम, जिजामाता महिला कृषी महाविद्यालय मांडकी पालवन च्या प्राचार्या डॉ. सौ.शमिका चोरगे मॅडम तसेच ग्रामसेविका साधना शेजवळ, गावचे सरपंच सुहास भागडे उपस्थित होते. महिलांनी रानभाज्या व भरड धान्याचा वापर करून चविष्ट पदार्थ बनवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
महिलांनी स्पर्धेमध्ये विविध रानभाज्यांचा समावेश करून विविध प्रकारच्या पदार्थांची पाककृती सादर करून आपली कला सादर केली. तसेच महिलांच्या करमणुकीसाठी मजेशीर खेळ खेळण्यात आले. डॉ.सौ .शमिका चोरगे मॅडम यांनी रानभाज्यांचे जीवनातले महत्त्व पटवून दिले. सौ अंजलीताई चोरगे मॅडम यांनी महिलांचे अस्तित्व आणि त्याचे महत्त्व पटवून दिले. स्पर्धा अटीतटीची असून स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे विजेते सौ.भाग्यश्री भागडे, द्वितीय क्रमांक तनवी पाचकुडे, तृतीय क्रमांक दिशा घडशी असे आहेत. सर्व मान्यवर व महिला वर्गाच्या उपस्थित कृषी कन्यांतर्फे कार्यक्रम उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला.