(रत्नागिरी / वार्ताहर)
मराठी संस्कृतीची प्रतिमा संस्कृतींच्या निष्ठेचे दर्पण…बांधुनी नात्याचे बंधन, करीन साता जन्माचे समर्पण, सातो जन्मो जन्मी हाच पती मला मिळो, अशी प्रार्थना आज वटपौर्णिमेच्या दिनी वटवृक्षाची मनोभावे भक्तिमय वातावरणात पूजा बहुसंख्य सुवासिनी रत्नागिरीतील प्रती पंढरपूर म्हणून ओळखली जाणारे श्री विठ्ठल मंदिर आवारातील वटवृक्षाची पूजा केली. अनेक सण, उत्सव मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरे केले जातात त्यापैकीच एक म्हणजे वटपौर्णिमा.
हा सण विवाहित महिला साजरा करतात.भारतीय संस्कृतीत वडाचे झाड पूजनीय मानले जाते.रत्नागिरीतील श्री विठ्ठल मंदिरातील आवारातील वटवृक्षाची विवाहित स्त्रिया हळदी कुंकू अक्षता पुष्प, नैवेद्य दाखवून पूजा करीत आहेत. वडाच्या झाडाला सुती दोरा गुंडाळून सुवासिनी सात प्रदक्षिणा भक्तिमय वातावरणात घालत आहेत आणि सात जन्मी हाच पती मला लाभो, त्याला दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना करीत आराधना करीत आहेत.
फोटो: प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणारे रत्नागिरीतील श्री विठ्ठल मंदिर आवारातील वटवृक्षाची पूजा करताना सुवासिनी बहुसंख्येने दिसत आहेत.
(छाया : दिनेश पेटकर रत्नागिरी)