(गणपतीपुळे / रत्नागिरी)
तालुक्यातील मालगुंड येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि ग्रामपंचायत मालगुंड यांचे माध्यमातून शिवसेनेचे रत्नागिरी तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांच्या विशेष प्रयत्नातून येथील प्रभाग क्रमांक एक ते प्रभाग क्रमांक चार मध्ये मार्गी लागणाऱ्या विविध विकासमांचा धडाका करण्यात आला आहे. या विकास कामांचा भूमिपूजन शुभारंभ मंगळवारी तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी ठाकरे गट शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश जाधव, विभागीय संघटक प्रवीण साळवी तालुका युवा सेना समन्वयक साईनाथ जाधव, युवा सेना उपतालुकाप्रमुख रोहित साळवी, मालगुंड च्या सरपंच श्वेता खेऊर, उपसरपंच संतोष चौघुले, माजी सरपंच दीपक दुर्गवळी , शाखाप्रमुख बाबा आग्रे, दशरथ साळवी, ग्रामपंचायत सदस्य व शिवसैनिक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
मालगुंडमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून विविध विकासकामांचा धडाका
या विकास कामांमध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये रहाटागर मांडवकर यांच्या घराजवळील सार्वजनिक विहीर बांधणे ,बाजारपेठ येथील हॉटेल वैभव शेजारी रस्त्याचे नामकरण करणे , जोशीवाडी येथील शिवाजी महाराज पुतळ्याच्या समोरील गटार बंदिस्त करणे प्रभाग क्रमांक दोन मध्ये भंडारवाडा येथील विकास मयेकर यांच्या घराजवळून स्मशानभूमीकडे जाणारी पाखाडी बांधणे, त्यानंतर भंडारवाडा येथे प्रितम मयेकर ते परेश हळदणकर यांच्या घराजवळील गटार बंदिस्त करणे, भंडारवाडा येथील येथील स्ट्रीट लाईट उद्घाटन करणे प्रभाग क्रमांक तीन मध्ये आग्राडीवाडी दुर्गवळीवाडी स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे, आग्राडीवाडी मुख्य रस्ता ते अशोक साळवी घराकडे जाणरा रस्ता डांबरीकरण करणे, धावडेवाडी अंतर्गत रस्ताऐ ते दीपक रेवाळे यांच्या घराजवळ जाणारा रस्ता तयार करणे, धावडेवाडी जनजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा करण्यासाठी विहीर खोदणे व वाडीसाठी पाणीपुरवठा योजना राबवणे .
तसेच प्रभाग क्रमांक चार मध्ये मालगुंड बौद्धवाडी येथे गटार लाईन करणे, मालगुंड आडी येथील सुजीत साळवी घराकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे, चौघुलेवाडी मुख्य रस्ता ते मनोज चौघुले यांच्या घराकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे आदी विकास कामांची भूमिपूजन करण्यात आली. या भूमिपूजन कार्यक्रमांमध्ये प्रभाग क्रमांक एक ते प्रभाग क्रमांक चार मध्ये ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत व फटाक्यांच्या आतषबाजी भूमिपूजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी प्रभाग क्रमांक एक ते चार मध्ये मुख्य रस्त्यांच्या ठिकाणावर भगवे झेंडे लावून वातावरण भगवामय करण्यात आले होते. या विशेष विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात मालगुंड बौद्धवाडी येथे तालुकाप्रमुख बंड्या साळवी उपतालुकाप्रमुख प्रकाश जाधव, ग्रामपंचायत सरपंच श्वेता खेऊर, उपसरपंच संतोष चौगुले, माजी सरपंच दीपक दुर्गवळी ग्रामपंचायत सदस्य शिल्पा पवार व स्मिता दुर्गवळी आदींचा सत्कार मालगुंड बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक १७ व बौद्ध ग्रामस्थ मंडळ मालगुंड यांच्या वतीने अध्यक्ष प्रकाश गुणाजी पवार ,उपाध्यक्ष भारत पवार, उपचिटणीस मयुरेश पवार, हिशोब तपासणीस रविकांत पवार, माजी अध्यक्ष दिवाकर पवार, महिला अध्यक्षा प्रज्ञा प्रकाश पवार, उपाध्यक्ष शर्मिला पवार, कोषाध्यक्षा धनश्री पवार, उपचिटणीस प्रज्ञा पवार आदींच्या हस्ते करण्यात आला. तसेच अन्य उपस्थितांचे स्वागत ही बौद्ध ग्रामस्थ मंडळ तर्फे करण्यात आले. त्यानंतर या ठिकाणी चर्चासत्र सभा घेण्यात आली. त्यामध्ये तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून विकासकामांचा अधिकाधिक धडाका लावण्याची ग्वाही दिली दिली.
अध्यक्षीय भाषणात प्रकाश पवार यांनी ठाकरे गट शिवसेनेकडून होत असलेल्या विकास कामाबद्दल समाधान व्यक्त करून तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांच्या कार्य प्रणालीचे विशेष कौतुक केले. हा संपूर्ण संपूर्ण भूमिपूजन कार्यक्रम प्रभाग क्रमांक एक ते चार मध्ये यशस्वी करण्यासाठी ठाकरे गट शिवसेनेच्या सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1
Also Read : “मुख्यमंत्री माझी शाळा”मध्ये आगाशे विद्यामंदिर जिल्ह्यात प्रथम