(चिपळूण)
तालुक्यातील बसस्थानकात गाडीची वाट पाहत असलेल्या महिलेच्या पर्समधील ४ तोळ्याचे मंगळसूत्र चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. या मंगळसुत्राची किंमत २ लाख रुपये इतकी असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार चिपळूण बसस्थानकात १४ ऑगस्ट रोजी दुपारी घडला असून, पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ही चोरी १४ ऑगस्ट रोजी दुपारी १२:३० ते १ वाजण्याच्या दरम्यान घडली. चिपळूण बसस्थानकात एक महिला दुपारी गाडीची वाट पाहत उभी होती. बसस्थानकात असलेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्याने महिलेच्या पिशवीतील पर्समधील ४ तोळ्याचे मंगळसूत्र चोरून नेले. या प्रकरणी १५ ऑगस्ट रोजी चिपळूण पोलिस स्थानकात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या चोरीचा अधिक तपास चिपळूण पोलिस करत आहेत. बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.