( वैभव पवार / गणपतीपुळे )
देशातील पहिले ऐतिहासिक प्राणी संग्रहालय मालगुंड मध्ये सुरू होणार असल्याची घोषणा रत्नागिरीचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मालगुंड येथे केली. तसेच येत्या एक दोन दिवसांतच या प्राणी संग्रहालयाची जागा मालगुंड मध्ये निश्चित होऊन लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी या प्राणिसंग्रहालयाचे काम सुरू होणार असल्याची घोषणा देखील त्यांनी हे मालगुंड येथे केली. मालगुंड गावच्या सुकन्या तथा रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती साधनाताई साळवी यांचा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी गुरूवारी 15 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात आपल्या शुभेच्छापर मनोगतात पालकमंत्री उदय सामंत यांनी माजी सभापती साधना साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचे व त्यांचे पती राजू साळवी यांच्या सामाजिक कामाचे विशेष कौतुक केले तसेच उपस्थित लोकप्रतिनिधींना त्यांच्या कामाची पद्धत दाखवून अशा पद्धतीने प्रत्येक लोकप्रतिनिधींनीपदी सामाजिक सेवेचे कामकाज केले पाहिजे असे सूचित केले. यानंतर बोलताना त्यांनी सांगितले की, या ठिकाणी या ठिकाणी साधनाताई साळवे यांचा वाढदिवस होत असताना खूप मोठी विशेष बाब आपल्यासमोर स्पष्ट करीत आहे ती म्हणजे मालगुंडमध्ये देशातील पहिले ऐतिहासिक आणि उत्कृष्ट पद्धतीचे प्राणी संग्रहालय होणार आहे. या प्राणिसंग्रहाचे जागा एक दोन दिवसांतच निश्चित होऊन लोकसभा व विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी त्याचे काम सुरू होईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. तसेच हे प्राणिसंग्रहालय मालगुंड येथे झाल्यानंतर आमचा असा अंदाज आहे की गणपतीपुळे येथे दरवर्षी 22 लाख पर्यंत भेट देतात मात्र त्याहीपेक्षा 30 लाखापर्यंत मालगुंड मध्ये पर्यटक भेटी देऊन मालगुंडच्या विकासाचा कायापालट होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.
साधनाताई साळवी यांच्या वाढदिवस शुभेच्छापर कार्यक्रमाला पालकमंत्री उदय सामंत यांचे समवेत तालुकाप्रमुख बाबू म्हाप, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रकाश साळवी, रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन पाटील, मालगुंडचे माजी सरपंच सुनील उर्फ बंधू मयेकर, राजूशेठ साळवी आदींसह विचारपठावर कोतवडे जिल्हा परिषद गटातील सरपंच, उपसरपंच, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.