(मुंबई)
बारामती लोकसभेची यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या पत्नी सुप्रिया सुळे यांचा पराभव केला. या लोकसभा मतदारसंघाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. येथे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या नणंद-भावजय अशी निवडणूक पार पडली. अशात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘तेव्हा माझी चूक झाली’ असं म्हणत कबुली दिली आहे. त्या काळामध्ये मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. त्यावेळेस केलं गेलं, पार्लामेंटरी बोर्डाकडून निर्णय घेतला गेला. पण एकदा बाण सुटल्यावर आपण करु शकत नाही. पण आज माझं मन मला सांगतं, तसं व्हायला नको होतं, अशी कबुली अजित पवार यांनी दिली. सध्या सगळीकडे अजित पवारांच्या या वक्तव्याची चर्चा रंगू लागली आहे.
दरम्यान, सुप्रिया सुळेंना प्रसारमाध्यमांनी यावर प्रतिक्रिया विचारली असता त्या ‘रामकृष्ण हरी…’ इतकंच म्हणत जास्त भाष्य करणं टाळलं. “एकतर मी हे विधान ऐकलेलं किवा वाचलेलं नाही. तुमच्याकडूनच मी हे ऐकत नाही. त्यामुळे रामकृष्ण हरी”. असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
अजित पवार हे सध्या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात फिरत आहेत. रक्षाबंधनाला राखी बांधायला सुप्रिया सुळेंकडे जाणार का? असा प्रश्न अजित पवार यांना मुलाखतीमध्ये विचारण्यात आला होता. त्यावर अजित पवार यांनी म्हटले की, आता माझा महाराष्ट्राचा दौरा सुरु आहे. रक्षाबंधनाच्यावेळी मी तिकडे असेन तर मी राखी बांधून घ्यायला बहिणींकडे जरुर जाणार, असे त्यांनी सांगितले.