(रत्नागिरी / वार्ताहर)
स्विफ्ट प्लेअर्स डान्स इन्स्टिट्यूट ही १५ वर्षे जुनी नृत्य अकॅडमी असून संस्थेला मुंबई व जवळपासच्या शहरांमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्विफ्ट प्लेअर्स डान्स इन्स्टिट्यूटने 20 हून अधिक स्पर्धा आणि रिअॅलिटी शो जिंकले असून १०० हून अधिक कार्यक्रमांमध्ये सादरीकरण केले आहे. या अकॅडमीमध्ये ५ वर्षांपेक्षा जास्त कौशल्यपूर्ण अनुभव असलेले प्रमाणपत्रधारक प्रशिक्षक आहेत. नृत्य विषयातील अभ्यासक्रमावर आधारित शिक्षणासाठी, व्यक्तिमत्व आणि सामाजिक कौशल्य सुधारण्यासाठी “स्विफ्ट प्लेअर्स” हे एक नावाजलेले व विश्वासार्ह व्यासपीठ आहे.
या शिबिरात “Hip-Hop” (हीप-होप) व भारतीय लोक नृत्यशैली “वाघ्या मुरळी” या दोन प्रकारच्या नृत्यशैली शिकवल्या जातील. सदर उन्हाळी शिबिरासाठी अभ्यासक्रमाचा कालावधी १० दिवस असून तो दररोज अडीच तासांचा असेल. दररोजच्या वेळापत्रकात अर्धा तास व्यायाम आणि दररोज दोन्ही नृत्यशैलींचा एक-एक तास सराव असणार आहे. हे नृत्य शिबिर ४ वर्षापुढील वयोगटासाठी असेल. शिबिराच्या शेवटच्या दिवशी प्रमाणपत्र देण्यात येईल.
Also Read : वास्तुशात्रानुसार आपले घर असल्याची खात्री करा!
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1
सदर नृत्य शिबिर १८ एप्रिल ते २७ एप्रिल २०२४ या कालावधीत सायं. ५ ते ७.३० या वेळेत, तर शेवटच्या दिवशी म्हणजेच २८ एप्रिल २०२४ रोजी खास पालकांसाठी प्रात्यक्षिक कार्यक्रम सकाळी ९ ते १२ या वेळेत होणार आहे. सदर नृत्य शिबिर श्रीमान यशवंत हरी गोखले भवन, संभाजी नगर नाचणे, साळवी स्टॉप, लिंक रोड, वेध शाळेसमोर, नाचणे, रत्नागिरी येथे संपन्न होणार आहे. तरी या शिबिरासाठी नाव नोंदणी करावयाची असल्यास मोबा. ७५०६३८१८८४ / ८७७९७७६९४७ क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.