( साखरपा/ दीपक कांबळे )
तिवरे तर्फे देवळे ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त समितीचे अध्यक्षपदी रुपेश अनंत कांबळे या युवकाची ग्रामसभेत बिनविरोध निवड झाली.
दिनांक 26 ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्त समितीची कमिटी गठीत करण्यात आली. यावेळी सर्वानुमते रुपेश कांबळे याची निवड करण्यात आली. सदर ग्रामसभेला सरपंच संतोष कांबळे उपसरपंच ओंकार सुर्वे व ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील संतोष कांबळे व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
रुपेश कांबळे यांचे वडील महानगरपालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून सेवेत होते. त्यांच्या अंगी सामाजिक धार्मिक व राजकीय पार्श्वभूमी चांगली होती. न्यायनिवाडा करण्यात ते तरबेज होते. त्यामुळे या घरातील संस्कारामुळे तंटामुक्त समितीच्या कामाला चांगला न्याय मिळेल असा विश्वास नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.