( साखरपा / दिपक कांबळे)
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा रत्नागिरीच्या अधिपत्याखाली संगमेश्वर तालुक्याची कार्यकारणी दिनांक 22 जून रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह देवरुख येथे तालुक्याच्या सर्वसाधारण सभेत गठीत करण्यात आली.
यावेळी त्रिसरण पंचशील घेऊन सभेला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सभाशास्त्रप्रमाणे मागील सभेचे इतिवृत्ताचे वाचन सरचिटणीस विजय मोहिते यांनी केले. तर प्रस्तावना तालुका अध्यक्ष राहुल मोहिते सर यांनी केले.
या बैठकीत विषय पत्रिकेप्रमाणे विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. याचसभेत जिल्हा शाखेच्या निरीक्षणाखाली तालुका शाखेची नूतन कार्यकारणी गठीत करण्यात आली आहे. जिल्हा शाखेचे अध्यक्ष अनंत सावंत, सरचिटणीस एन बी कदम, विकास पवार, विजय जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
एकवीस जणांची नूतन कार्यकारणी
नूतन कार्यकारणीमध्ये अध्यक्ष राहुल मोहिते, सरचिटणीस मनोहर मोहिते, कोषाध्यक्ष संजीवन सावंत, उपाध्यक्ष (संस्कार) महेंद्र जाधव, उपाध्यक्ष (पर्यटन प्रचार) प्रकाश कांबळे, उपाध्यक्ष (संरक्षण एस एस डी) विजय कांबळे, हिशोब तपासणीस दीपक कांबळे, कार्यालयीन सचिव प्रदीप मोहिते, सचिव (संस्कार) अशोक मोहिते, सचिव (पर्यटन प्रचार) प्रवीण जाधव, सचिव (संरक्षण एसएसडी) जयेश मोहिते, सचिव (संरक्षण एसएसडी) प्रशांत मोहिते, संघटक मनोहर मोहिते, संघटक अ. जा. मोहिते, संघटक डॉ. संजय मोहिते संघटक अमरदीप कदम ,संघटक समीर मोहिते, संघटक संतोष कांबळे, संघटक मोहन कांबळे अशी एकवीस जणांची जंबो कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.