(पुणे)
शिपवर काम करणारा पुण्याचा तरुण अमेरिकेतून बेपत्ता झाल्याने त्याचे कुटुंबीय चिंतेत आहेत. प्रणव कराड असे या तरुणाचे नाव असून हा तरुण गेल्या ६ महिन्यांपासून मुंबईतील विल्हेल्मसेन शिप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या जहाजावरील डेट कॅडेट म्हणून काम करत होता.
प्रणव हा पुण्यातील एमआयटीमध्ये शिक्षण घेत होता. त्याची विल्हेल्मसेन शिप मॅनेजमेंट या अमेरिकेतील कंपनीत त्याची निवड झाली होती. अमेरिकेत तो जॉईन होण्यासाठी गेला होता. कामदेखील सुरु झालं. दरम्यान, 5 एप्रिल रोजी तो हरवल्याचा फोन कंपनीकडून आला. त्यानंतर या संदर्भात 6 एप्रिल रोजी मेल आला. मात्र कंपनीने बाकी काहीच माहिती दिली नाही शिवाय सहकाही आणि मित्रांचे मोबाईल नंबरदेखील दिले नाहीत, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
Aslo Read : तळहातावर कोठे असते अपत्य रेषा; मूल होण्याचा कार्यकाळ कशी दर्शवते अपत्य रेषा
तो बेपत्ता झाला, तेव्हा तो सिंगापूर आणि इंडोनेशियादरम्यान प्रवास करणाऱ्या जहाजावर तैनात होता. मात्र, शुक्रवारी फोन करुन कंपनी अधिकाऱ्यांनी तो बेपत्ता झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबाला दिली. त्याच्या वडील गोपाल कराड यांनी सांगितले की,गेल्या ३ दिवसांपासून प्रणव बेपत्ता आहे. कंपनीने आम्हाला सांगितले की, त्याचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. मात्र तो कसा बेपत्ता झाला, याबद्दल आम्हाला अधिक काही माहिती दिली नाही. गुरुवारी आम्हाला त्याचा व्हॉट्सॲप कॉल आला होता. प्रणव बेपत्ता असल्याची माहिती दिल्यानंतर आतापर्यंत मुंबईतील कंपनीने कोणतीही समाधानकारक माहिती दिलेली नाही, असंही त्याच्या वडीलांनी सांगितलं आहे.
प्रणवचे वडील गोपाळ कराड म्हणाले की, “आमचं पाच दिवसांपूर्वी प्रणव याच्याशी बोलणं झालं होतं, तो खूप आनंदी होता. नेहमी आम्ही त्याच्याशी बोलत होतो. त्याला कुठलाही दबाव नव्हता किंवा घरुन कुठलंही टेंशन नव्हतं. माझा मुलगा मला परत मिळाला पाहिजे. कंपनी कोणतीही माहिती व्यवस्थित देत नाही. आमचं शोधकाम सुरू आहे, एवढच कंपनी म्हणत आहे. सरकारनं या प्रकरणात लक्ष घालून कंपनीशी बोलावं. प्रणवचा तपास करावा,” अशी मागणी त्यांनी केली असल्याचे सांगितले. पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र व्यवहार आणि जहाजबांधणी मंत्रालयापर्यंत पोहोचण्यात आम्हाला मदत करण्यासाठी आम्ही पुणे आणि मुंबईतील पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1