(माखजन / वार्ताहर)
संगमेश्वर तालुक्यातील माखजनचे रहिवासी प्रकाश सुडकूशेठ रेडीज यांचे आकस्मित निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. प्रकाश रेडीज हे अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून सर्वांचे सुपरिचित होते. मनमिळावू स्वभावाचे असल्याने त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. माखजन येथील श्रीराम मंदिरात सगळ्या उत्सवात हिरीरीने भाग घेत असत. त्यांच्या जाण्याने न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. भारतीय जनता पार्टी चे ते निस्सीम कार्यकर्ते होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे ते चाहते होते. अटलजींचा फोटो देखील त्यांच्या घरी दर्शनी भागात आहे. त्यांच्या पश्चात मुली,जावई,भाऊ,पत्नी असा परिवार आहे. प्रकाश रेडीज यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांनी त्यांच्या निवसस्थानाकडे धाव घेतली.प्रकाश रेडीज हे कस्टम ऑफिस मधून सेवानिवृत्त झाले होते.