(संगमेश्वर / प्रतिनिधी)
तालुक्यातील कडवई गावात अवैध दारू बाळगल्या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. शंकर जानू भडवलकर ( वय 58, राहणार कडवई, राजवाडी, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी) याच्यावर विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू बाळगल्याचा आरोप आहे.
सोमनाथ विश्वनाथ आव्हाड, संगमेश्वर पोलीस ठाणे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अंतर्गत कलम 65(ई) प्रमाणे आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा गुन्हा दिनांक 21 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 8:31 वाजता नोंदविण्यात आला. हि घटना दिनांक 21 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6:20 वाजता मौजे कडवई, वाणीवाडी, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी येथे घडली.
या कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपीकडून पाचशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात मळकट सफेद रंगाचा प्लास्टिकचा ५ लिटरचा कॅन, ज्याला धरण्यासाठी कडी व दाबाचे बुच आहे आणि त्यात ५ लिटर गावठी हातभट्टीची दारू होती.