(रत्नागिरी / वार्ताहर)
सध्या रत्नागिरीमधे डेंग्यू या आजाराचे रुग्ण वाढले आहेत, शासकीय रुग्णालयात रक्ताचा मोठा तुटवडा असून रुग्णाची मोठी गैरसोय होत आहे, या परिस्थितीचा विचार करून रोटरी क्लबने विचार करुन दि. ३ ऑगस्ट २०२४* रोजी, “कर्तव्य” भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. रोटरी क्लबचे सदस्य रक्तदान शिबिर भव्य व यशस्वी करणेसाठी मेहनत घेत आहेत. रक्तदान करणेसाठी सकाळी १० ते २ या वेळेत दैवज्ञ भवन, पॉवर हाऊस, नाचणे रोड, रत्नागिरी येथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून “रक्तदान” या पवित्र कार्यात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.
शिबीराबाबत अधिक माहितीसाठी अध्यक्ष रुपेश पेडणेकर मो.९८२२६८८०६८, सचिव ॲड.मनिष नलावडे मो.९९७०४४३१३७, धीरज वेल्हाळ मो.७०२१६०१९८० या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी तर्फे आवाहन करण्यात आले आहे.