(जैतापूर / वार्ताहर)
राजापूर तालुक्यातील नाटे नगर विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, नाटे या प्रशालेतील इयत्ता 9 वी तील कुमारी प्रिया सुयोग बसणकर, कुमारी मुग्धा कृष्णकुमार लाड, कुमारी ग्रिश्मा विद्याधर दळवी, कुमार सूरज संदेश बसणकर, कुमार गितेश नितीन मांजरेकर, कुमार सुदेश योगेश गिजम व कुमार फिदयान दिलनवाज सोलकर या विद्यार्थ्यांची समग्र शिक्षा शिक्षण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी मार्फत राज्याबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे.
सदरचा अभ्यासदौरा हा दिनांक 8 मार्च ते 11 मार्च 2024 या कालावधीत बेंगलोर या ठिकाणी होत असून तिथे हे विद्यार्थी ISRO, सायन्स मुझिअम, बनिगट्टा नॅशनल पार्क, लालबाग बोटॅनिकल गार्डन, बेंगलोर (कर्नाटक )या ठिकाणी भेट देणार आहेत. या विद्यार्थांसोबत अभ्यास दौऱ्यासाठी प्रशालेचे सहाय्यक शिक्षक चव्हाण हेही सहभागी झाले आहेत.
Also Read : गावखडीचे जागृत देवस्थान श्रीदेव रामेश्वर
या सर्वांना अभ्यासदौऱ्यासाठी संस्था म्हणून नाटे ग्रामपंचायतीचे सरपंच तथा संस्थाप्रमुख संदीप रामचंद्र बांदकर, उपसरपंच, अन्वर कासम धालवेलकर, संस्था पदाधिकारी सुनिल वसंत कामतेकर, मकरंद मधुसूदन धाक्रस, संजय काशीनाथ चव्हाण,
निलेश विठ्ठल बांदकर, संजीवनी संजय चव्हाण, सुवर्णा रामचंद्र बांदकर, ज्योती श्रीकृष्ण पेडणेकर, श्रुतिका सच्चिदानंद बांदकर, प्रांजल परेश लकळे, रचना राजेंद्र खांबल ग्रामविकास अधिकारी राजेंद्र प्रसाद राऊत,शिक्षक – पालक संघाचे उपाध्यक्ष राजन लाड तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक रविंद्र तानू जाधव, सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्याना या अभ्यास दौऱ्यासाठी शुभेच्छां दिल्या आहेत.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1