(राजापूर / तुषार पाचलकर)
‘निपुण भारत अभियान’ अंतर्गत ‘शाळा बाहेरील शाळा’ एपिसोड 590 या भागात जि.प.प्रा.शाळा पाचल नं 2 शाळेची विद्यार्थीनी कुमारी मनस्वी जीवन सुतार, इ.3री या विद्यार्थीनीची व तीचे पालक सौ. जान्हवी जीवन सुतार यांची नागपूर आकाशवाणी रेडिओ कार्यक्रमात दि. 29/02/2024 रोजी सायंकाळी 5.00ते 6.30 या वेळेत कुटुंबसंस्थेत कसा बदल होत गेला? या विषयावर मुलाखत झाली.
सदर विद्यार्थांची मुलाखत सामाज्याला एक संदेश देणारी व उत्साह निर्माण करणारी झाल्याने पाचल गावचे माजी उपसरपंच श्री. किशोरजी नारकर, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विनायकजी सक्रे व सामजिक कार्यकर्ते श्री. बाबा सुतार यांनी सदरच्या शाळेत विद्यार्थींनी कुमारी मनस्वी जीवन सुतार व शाळेचे शिक्षक गणेश पाटील व रेणुका पाटील यांचे पुष्प देवून कौतुक करताना पुढे अशीच कामे करण्यासाठी प्रेरणा दिली. सदरच्या मुलाखतीमुळे मनस्वी चे सर्व स्तरावरून कौतुक केलं जात आहे.