( चिपळूण )
गुहागर विधानसभा मतदार संघात परिवर्तन घडवायचे असेल, गुहागर मधील मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी कुणबी समाज्याचा उमेदवार असणं हीच मोठी जमेची बाजू आहे. याकरता कुणबी समाजाने पुढाकार घ्यावा वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून निवडणुकीची यंत्रणा उभी करू अशा स्पष्ट शब्दात वंचित बहुजन विकास आघाडीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितले.
विकास अण्णा जाधव पत्रकारांशी बोलताना पुढे म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीचे मी गेले सहा वर्ष काम करीत आहे पक्षाचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने मला दोन वेळा जिल्हाध्यक्ष पदाची संधी मिळाली तर एकदा विधानसभा लढवण्याचा मला मान मिळाला विधानसभा निवडणूक लढल्यानंतर माझ्या लक्षात आले की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सरास कुणबी,बौध्द, मुस्लिम या मतांची जी टक्केवारी आहे. त्या टक्केवारीवरती जर आपण गणित कधी केली तर मला वाटतं इथे असणारे जे स्वतःला पुढारी समजतात जे विकासक समजतात जे या कोकणाला आम्ही खूप काही मोठे योगदान दिले आहे असे मानतात त्यांना या मतदार संघातील बहुजन समाज निवडणुकीत चांगलाच तडा देऊ शकतो असेही जाधव म्हणाले.
यापुढे ते म्हणाले की, त्यांना वारंवार संधी दिली यांनी वारंवार इथल्या असणाऱ्या पक्षात जो पक्ष यांना आवडतो जो पक्ष यांना ज्या ज्या पद्धतीने यांचा स्वतःचा विकास करण्यासाठी म्हणून का होईना हे पक्ष निवड करतात आणि मतदारांना असं समजून जातात की हे मतदार आमच्याबरोबर आहेत .आम्ही कुठे गेलो तरी निवडून येऊ प्रामुख्याने आम्ही आमचे नेते बाळासाहेब आंबेडकरांना मी विनंती केली की थोडासा आम्हाला कालावधी द्या आम्हाला या वेळेला एक वेगळा चमत्कार घडवायचा आहे. आम्ही सर्वजण जो बहुजन वर्ग म्हणतो त्या बहुजन वर्गातला कुणबी समाज जो आहे. तो कुणबी समाजाकडे आमची अपेक्षा आहेत की कुणबी समाज कधी नेतृत्व हातात घेतोय कुणबी तेली, माळी, आदिवासी, अल्पसंख्यांक, स्त्री, बौद्ध, दलित या सगळ्या चळवळींचे नेतृत्व करणारा एकमेव इथं जर कोण नेता असेल तो म्हणजे कुणबी समाज कारण मी प्रामुख्याने पाहिले कुणबी समाजाची ताकद कुणबी आणि ऐक्य कुणबी समाजाची असणारी विचार करण्याची शक्ती शिवराय, फुले, शाहू ,आंबेडकर सांगता ते आता नेतृत्व हातात घेणे इतके पर्यंत पोहोचावे आणि पोचले पाहिजे या अपेक्षेने आम्ही काम करतोय असे जाधव म्हणाले. माझं कुणबी समाजाला आव्हान आहे की, आपण ज्या ज्या पक्षातून नेतृत्व मांडताय त्या पक्षांमध्ये आपल्याला स्वातंत्रपणे स्वतंत्र बंधुत्वची नाळ जोडून काम करता येईल का हा थोडा विचार करावा. बाळासाहेब आंबेडकर स्वतः ॲडवोकेट आहेत, त्यांना कूळ कायद्यांची जवळून माहिती आहे. म्हणून इथला असणारा कुळ कायदा जो विषय कुळ कायद्याच्या संदर्भाच्या आम्हाला जो काही आवाज उठवण्यासाठी आमच्या असणाऱ्या माता भगिनींचा, शेतकऱ्यांचा, बेरोजगारांचा, कंपन्यांच्या, पर्यटकांच्या, रस्त्याच्या संदर्भातील पाण्याच्या संदर्भातील प्रश्न आमच्या आया बहिणींच्या इज्जतीचा प्रश्न हे मांडण्यासाठी आमच्या हक्काचा माणूस इथे भेटत नाहीय आणि तो भेटण्यासाठी आमचे चळवळ चालू आहे ती म्हणजेच कुणबी समाज पुढे आला पाहिजे, कुणबी समाजाचा आमदार येथून विधानसभेत गेला पाहिजे. कारण कुणबी समाज गेल्या सातत्याने कित्येक वर्ष सगळ्या स्थरात काम करतो सगळ्यात थरात उन्नती करतोय आम्हाला बहुजन समाजाचा आमदार मिळाला की आम्हाला हक्काने स्वतःचा विकास आमच्या नजरेने करता येईल. इथे असणाऱ्या सर्वसामान्य माणसाला वाटेल की मी आमदार झालोय मी खासदार झालो, मी नगरसेवक झालो, मी जिल्हा परिषद सदस्य झालो, आमची बाजू हक्काने मांडण्याकरीता आम्हाला कुणबी समाजच पाहिजे, असे मत जाधव यांनी मुलाखतीत बोलताना व्यक्त केले.