(संगमेश्वर / एजाज पटेल)
विज्ञान हा आजच्या आधुनिक जीवनाचा अविभाज्य भाग असून, मानवाला सर्व क्षेत्रात प्रगती साधून चांगलेच जीवन जगण्यासाठी विज्ञानाची खरी गरज आहे. विज्ञानमुळे विध्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीचा, सुजनशिलतेचा विकास होत असतो. देशाचे भवि्तव्य घडवीणारे ग्रामीण भागतील बालवैज्ञानिक अशाच प्रदर्शनातून पुढे येतील असा विश्वास बँक ऑफ इंडिया संगमेश्वर शाखेचे शाखाधिकारी एजाज पठाण यांनी व्यक्त केला
संगमेश्वर तालुक्यातील दादासेब सरफरे विद्यालयात शाळांतर्गत विज्ञान प्रदर्शन नुकतेच पार पडले. या प्रदर्शन कार्यक्रमाचे उदघाटन बँक ऑफ इंडिया संगमेश्वर शाखेचे शाखाधिकारी एजाज पठाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी बँकेचे वरिष्ठ अधिकारी मनोज सिंग, बँक मित्र निलेश कदम हे ही उपस्थित होते. तर संस्था सचिव शरद गोविंद बाईत, ललितकुमार अनंत लोटणकर संस्था संचालक, प्रकाश भानुदास वीरकर मुख्याध्यापक, महावीर बापू साठे पर्यवेक्षक, संदीप जयवंत जाधव, विज्ञान विभाग प्रमुख, नीलम सचिन पवार, संदीप विष्णू नटे, अंबादास जरे, स्वरा योगेश शिंदे, अमित आत्माराम भुवड आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावे आणि विध्यार्थी चिकित्सक वृत्ती जोपासली पाहिजे म्हणुन विद्यार्थ्यांमधून करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी विध्यार्थी तसेच लोकांनी गर्दी केली होती.
काही दिवसांपूर्वीच राज्यशासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुदंर शाळा अभियानात खासगी व्यवस्थापनामध्ये तालुक्यात प्रथम क्रमांकाचे हे विद्यालय मानकरी ठरल्याने बँक शाखाधिकारी एजाज पठाण, वरिष्ठ अधिकारी मनोज सिंग आणि बँक मित्र निलेश कदम यांनी सर्व शिक्षक, संस्था संचालक मंडळ, विद्यार्थी यांचे अभिनंदन करून पुढील शुभेच्छा दिल्या.