( गणपतीपुळे / वैभव पवार )
रत्नागिरी तालुक्यातील निवेंडी केंद्राच्या केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन उद्या दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी होणार आहे. यावेळी निवेंडी केंद्रातील शाळांच्या विविध क्रीडा स्पर्धा रंगणार असून या स्पर्धेचे उद्घाटन गुरुवार दिनांक 12 डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता र भगवतीनगरच्या सरपंच प्रगती भोसले यांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धा गुरुवार दिनांक 12 डिसेंबर व शुक्रवार दिनांक 13 डिसेंबर या दोन दिवशीय कालवधीत भगवती क्रीडानगरी भगवतीनगर निवेंडी येथे होणार आहे.
यावेळी या स्पर्धेला गणपतीपुळे बीट च्या शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच निवेंडी केंद्रातील शाळांचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समित्यांचे अध्यक्ष, शालेय शिक्षक व पालक उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ 12 डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजता व शुक्रवार दिनांक 13 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता होणार आहे. या स्पर्धेला मोठ्या संख्येने पालक व ग्रामस्थ आणि क्रीडा प्रेमीनी उपस्थित राहावे असे आवाहन खालची निवेंडी शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर सावंत, मुख्याध्यापक संतोष शिरकर केंद्रप्रमुख रवींद्र आग्रे आदींनी केले आहे.