(देवरूख / प्रतिनिधी)
बापाने संगनमताने बनावट कागदपत्रे बनवून बाळाची विक्री केली. पत्नीच्या तक्रारी नंतर सदर प्रकार उघड झाला आहे. रत्नागिरीमध्ये दीड महिन्याच्या बाळाची विक्री केल्याचा गंभीर प्रकार उघड झाला असुन बापासह पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत हाती आलेल्या माहितीनुसार मुंबई उपनगरातील जोडप्याकडून बापाशीच संगनमत करत बेकायदेशीरपणे मूल दत्तक घेणाऱ्या रत्नागिरी शिरगावातील दाम्पत्यासह ५ जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या संशयितामध्ये एक शिक्षका असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
बाळाची आई सौ. सिद्धी हातिम हीने दीलेल्या तक्रारीनुसार बाळ घेणाऱ्या या दाम्पत्याने बाळाची बेकायदेशीर बनावट नोंदणी करण्याचाही प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू केली आहे.
सिध्दी हातिम (वय २४, रा. रहेजा काँम्प्लेक्स मालाड मुंबई) या महिलेने रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारी नुसार पती प्रसाद हातिम याने अन्य चार जणांनी संगनमताने हा गुन्हा केल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे. २३ फेब्रुवारी २०२४ ला सकाळी ११ वाजता रत्नागिरीतील दुय्यम निबंधक कार्यालयात बालक माता यांना आणून जबरदस्तीने दत्तकविधान पत्रावर सह्या घेतल्या व नोंदणी करण्यात आली असा जबाब नोंदवून दिला.
सिद्धी प्रसाद हातिम हिने शहर पोलिस ठाण्यात तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विवाहितेचा पती प्रसाद नरेंद्र हातिम (रा. रहेजा कॉम्प्लेक्स मालाड, मुंबई), बाळ खरेदी करणारे दांपत्य आज्ञा संतोष माने तिचा पती, संतोष विजय माने (दोन्ही रा. शिवरेवाडी शिरगाव, रत्नागिरी), मयुरी निखिल जाधव (रा. अंधेरी, मुंबई) आणि अजय जाधव (रा. बदलापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत
सिद्धी हातिम यांच्या स्वराज नावाच्या दीड महिन्याच्या बाळाची ६० हजार रुपयांना विक्री केली. त्यानंतर पीडित मातेचा पती प्रसाद याने मुंबईत गेल्यावर तिला घराबाहेर काढले. याप्रकरणी पाच जणांविरोधात बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ चे कलम ८०,८१ भादंवि कायदा कलम ३२३, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात नोंदणी निबंधक ही अडचणीत येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विलास जाधव करत आहेत.