(संगमेश्वर / एजाज पटेल)
चवे येथून परचुरी येथे ट्रक मधून चिरे वाहतूक करताना अपघात होऊन या अपघातात पाचजणांना दुखापत तसेच एकाचा मृत्यू झाला होता. हा अपघात शनिवारी दुपारी उक्षीकडे जाणाऱ्या वळणावर झाला होता. या अपघातातील ट्रक चालक आनंद धनसिंग राठोड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रत्नागिरी तालुक्यातील चवे येथे अतुल अनंत सावंत कोळीसरे (रत्नागिरी ) यांच्या मालकीचे चिरेखण असून तेथून त्यांच्या मालकीच्या असलेल्या MH10/AW/2757या नंबर च्या ट्रक मधून चिरे भरून परचुरी बौद्धवाडी येथील बबन पवार यांच्या घेऊन जात असताना उक्षी रेल्वेस्टेशन रोडकडे जाणाऱ्या परचुरी हद्दीत ट्रक पलटी झाला. यात चालक आनंद राठोड याच्यासह सिध्दु मोतीराम चव्हाण, शिवाजी भिलु राठोड, अशोक बावु पवार, कुमार तेजु राठोड, रसोमलु राठोड असे अन्य पाचजण होते होते. अपघातातील या लोकांना काही लोकांनी बाहर काडून खासगी वाहनाने जाकादेवी येथे प्राथमिक उपचारासाठी नेले असता यातील सिद्धू मोतीराम चव्हाण मूळ राहणार कर्नाटक सध्या राहणार चवे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल येथे हलवण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
त्याच्यावर रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून नातेवाईकांनी रुग्णवाहिकेतून मूळ गाव कर्नाटक जिल्ह्यात घेऊन गेले. आनंद राठोड यांनी बेदरकारपणे ट्रक चालवल्याने अपघात होऊन सिद्धू चव्हाण याचा अपघातात मृत्यू व अन्य नुकसान झाल्याने नुकसानीस जबाबदार म्हणुन त्याविरुध्द भारतीय न्याय संहिता कायदा कलम १०६(१), २८१, १२५ (अ), १२५ (ब),प्रमाणे गुन्हा दखल करण्यात आला आहे.