(वरवेली / वार्ताहर)
जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय कामथे येथे दिव्यांग तपासणी शिबीर व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा शासकीय जिल्हा रुग्णालय रत्नागिरीचे शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप व उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र कुमार राजमाने यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी कामथे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.असीत नरवडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ज्योती यादव शिव आरोग्य सेनेचे जिल्हा सह समन्वयक शशिकांत चव्हाण अनेक मान्यवर उपस्थित होते. या दिव्यांग तपासणी शिबिराचा अनेक दिव्यांग बंधू भगिनींनी लाभ घेतला.
शिव आरोग्य सेनेचे जिल्हा समन्वयक शशिकांत चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व रुग्णांना चहा बिस्कीट व पिण्याच्या पाण्याची बाटली वाटप करण्यात आले. जिल्हा शासकीय रुग्णालय/उपजिल्हा रुग्णालय कामथे यांच्यावतीने शशिकांत चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आले .आरोग्य क्षेत्रातील दिलेल्या सेवेबद्दल आभार व्यक्त करण्यात आले आणि अभिनंदन करण्यात आले. या शिबिरामध्ये अस्थिव्यंग, मानसिक तसेच अंध या संबंधित दिव्यांग तपासणी करण्यात आली. यावेळी दिव्यांगाना प्रमाणपत्रे वाटप करण्यात आले.