(राजापूर)
सागरी महामार्गावरील सिंधुदुर्ग रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा राजापूर तालुक्यातील दांडे-अणसुरे पुलाच्या दुरूस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलाचे रखडलेले काम लवकरात लवकर मार्गी लागावे आणि होणारी जनतेची गैरसोय दूर व्हावी यासाठी सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण उर्फ भैया सामंत यांनी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली होती. सध्या युध्दपातळीवर हे काम सुरू असून येत्या पंधरा दिवसात हे काम पुर्ण होवून हा पुल वाहतुकीस खुला करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिपक नागले यांनी दिली आहे.
दांडे-अणसुरे पुलाच्या दुरूस्तीचे कामाचे ठिकाणी दिपक नागले यांनी नुकतीच भेट देवून पाहणी केली. या पावसाळयात या पुलावरून सुरळीत वाहतुक सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून हे काम वेळीच पुर्ण व्हावे यासाठी सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण उर्फ भै्या सामंत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पाठपुरावा करत होतो. आता हे काम अंतीम टप्यात आले असून येत्या पंधरा दिवसात हा पुल वाहतुकीस खुला होईल असा विश्वास नागले यानी व्यक्त केला आहे. त्यामुळे जनतेची होणारी गैरसोय दूर होणार असल्याचे नागले यांनी सांगितले.
सागरी महामार्गावरील सिंधुदुर्ग रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा राजापूर तालुक्यातील दांडे-अणसुरे पुलाच्या दुरूस्तीचे काम गेले वर्षभर अत्यंत संथ गतीने सुरू आहे. सदरचे काम पावसाळयापुर्वी पुर्ण होऊन वाहतुक सुरू होईल असा दावा प्रशासनाने केला होता. मात्र अद्यापही काम पुर्ण झालेले नाही. त्यामुळे लवकरात लवकर हे काम मार्गी लावण्याच्या दृष्टीने किरण सामंत यांनी प्रशासनाला सूचना केल्या होत्या. तर पुलाअभावी स्थानिक जनतेची होणारी गैरसोय दूर व्हावी यासाठी किरण सामंत यांनी पर्यायी व्यवस्था केली होती.
सागरी महामार्गावरील सिंधुदुर्ग रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा राजापूर तालुक्यातील दांडे-अणसुरे पुल बांधल्यापासून सुमारे पाच वर्षातच नादुरूस्त झाला होता. दांडे अणसुरे बाजूकडील पुलाचा काही भाग खचल्यामुळे तो धोकादायक झाला होता. त्यामुळे गतवर्षी मार्च महिन्यापासून हा पूल वाहतूकीसाठी बंद करून दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या पुलाच्या दुरूस्तीचे काम 10 कोटी रूपये खर्चुन घारपूरे कन्स्ट्रक्शन ही कंपनी करीत आहेत. मुळ पुलाच्या जागी असलेला भराव हटवून 1 पीलर वाढवून पुलाची लांबी वाढविली आहे. यासाठी अपेक्षित कालावधी तीन महिन्याचा असताना आता वर्षभराचा कालावधी लोटला तरी पुल वाहतूकीसाठी सुरू न झाल्याने दोन्हीही जिल्ह्यातील वाहनचालक व जनतेला प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले.
आता हे काम अंतीम टप्यात आले असून पावसाळयात हा पुल वाहतुकीस खुला होवून होणारी गैरसोय दूर होणार असल्याचे नागले यांनी पत्रकारांना सांगितले. आपण संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांसमेवत नुकतीच या कामाची पाहणी केली. याप्रसंगी स्थानिक ग्रामस्थ रमेश काजवे, महिला उपतालुकाप्रमुख सिध्दी शिरसेकर, शाखाप्रमुख संदीप कदम, संतोष लिंगायत, संतोष जैतापकर, अमोल कांबळी, राहुल आंबोळकर आदी उपस्थीत होते.