(नवी दिल्ली)
भारतात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण याला खूप महत्त्व दिले जाते. वर्षातील पहिले सूर्यग्रहण आज ( ८ एप्रिल रोजी) होणार आहे. सूर्यग्रहण वेळ रात्री ८:१२ पासून सुरू होईल आणि पहाटे २:२२ पर्यंत राहील. विशेष म्हणजे यंदाच्या वर्षातील हे पहिलेच सूर्यग्रहण आहे. जर आपण स्मार्टफोनवरून या खगोलीय घटनेचे फोटो क्लिक करू इच्छित असाल तर मात्र सावधगिरी बाळगली पाहिजे.
सूर्यग्रहण ही एक घटना आहे, ज्यामध्ये चंद्र पृथ्वी आणि सूर्यासमोर येतो, ज्यामुळे पृथ्वीवर अंधार पडतो. हे सूर्यग्रहण तब्बल 5 तास 25 मिनिटे हे ग्रहण असणार आहे. या सूर्यग्रहणाबद्दल लोकांमध्ये उत्साहआहे. सोशल मीडियावरही या सूर्यग्रहणाबद्दल लोकांमध्ये क्रेझ बघायला मिळतंय. 8 एप्रिल 2024 रोजी पहिले सूर्यग्रहण लागणार आहे. या सूर्यग्रहणात काही वेळ दिवसा पूर्णपणे काळोखा देखील होणार आहे.
Also Read : शुक्राचे उच्च राशीत परिवर्तन झाल्याने तीन राजयोग; सुवर्णकाळ आहे ‘या’ राशींसाठी
ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये हे आपण सर्वजण लहानपणापासून ऐकत आलो आणि समजत आलो आहोत. ग्रहणातून निघणारे हानिकारक किरण डोळ्यांना हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे अनेकजण आपल्या स्मार्टफोन्सने सूर्यग्रहणाचे फोटो काढण्याच्या तयारीत असल्यास नासाकडून इशारा देण्यात आला आहे. सूर्यग्रहण आपल्या डोळ्यांसाठी हानिकारक असू शकते आणि ते आपल्या स्मार्टफोनला देखील हानी पोहोचवू शकते. ग्रहणकाळात जसे आपण डोळ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करतो, त्याचप्रमाणे आपल्या स्मार्टफोनचेही संरक्षण करणे गरजेचे आहे.
दरम्यान, प्रसिद्ध YouTuber Marques Brownlee ने त्याच्या X हँडलवर एक पोस्ट पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे कि, आजपर्यंत मला याचे उत्तर मिळाले नाही की स्मार्टफोनने सूर्यग्रहणाचे फोटो काढल्याने फोनचा कॅमेरा सेन्सर कसा खराब होऊ शकतो ? मार्क्सच्या या पोस्टवर नासाकडून उत्तर देण्यात आले आहे.
I cannot for the life of me find a definitive answer to whether or not pointing a smartphone at the solar eclipse will fry the sensor
Tempted to just take a phone I don't need and point it at the sun for 5 minutes to find out the real answer myself. In the name of science
— Marques Brownlee (@MKBHD) April 4, 2024
मार्क्सला उत्तर देताना नासाने आपल्या फोटो विभागाचा हवाला देत लिहिले की, स्मार्टफोन कॅमेऱ्याने सूर्यग्रहणाचे फोटो काढल्याने कॅमेरा सेन्सर खराब होऊ शकतो. फोनचा कॅमेरा सेन्सर सुरक्षित ठेवण्याचा उपायही नासाने सुचवला आहे. नासाने सांगितले की, सूर्यग्रहणाच्या धोकादायक किरणांपासून कॅमेरा सेन्सरचे संरक्षण करण्यासाठी लेन्सच्या समोर ग्रहण चष्मा लावणे आवश्यक आहे. यामुळे तुमचा फोन पूर्णपणे सुरक्षित राहील.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1