(रत्नागिरी)
तालुक्यातील एका १७ वर्षीय मुलीवर मातृत्व लादणाऱ्या संशयिताची न्यायालयाने ५० हजारांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केली. रामदास मनोहर शिंदे उर्फ प्रेम तांडेल (२७, रा. देहूरोड पुणे) असे संशयिताचे नाव आहे.
पिडीतेने संशयिताविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी रामदास शिंदेविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३७६ व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ (पोक्सो) चे कलम ४, ६, ८, १२ नुसार गुन्हा दाखल केला. याप्रकरणी शिंदे याला अटक झाली. त्याने जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्याची ५० हजारांच्या जामीनावर मुक्तता केली. रत्नागिरीचे जिल्हा सत्र न्यायाधीश सुनील गोसावी यांनी हा निकाल दिला.